डिश टीव्ही अँड्रॉईड सेट टॉप बॉक्स किंमत, टीव्ही कनेक्टर साठी एचडीएमआय मॉनिटर
Recharge, Manage your Account & Explore Exciting Offers!
close
DTH India, Digital TV, DTH Services| Dish TV
  • त्वरित रिचार्ज

  • New Connection नवीन कनेक्शन
  • Need Help मदत मिळवा
  • My Account लॉग-इन
    My Account माझे अकाउंट
    Manage Your Packs तुमचे पॅक्स मॅनेज करा
    Self Help सेल्फ हेल्प
    Complaint Tracking तक्रारीचे ट्रॅकिंग
Atminirbhar

तुमच्या टीव्हीमध्ये खूप काही बघावे असे वाटत असेल तर dishsmrt hub वापरा केवळ @ 1694#

आत्ताच मिळवा

dishSmartHub
#विद्यमान डिश टीव्ही सबस्क्रायबर्ससाठी + पॅक किंमत
 
hub
hub
hub
hub
hub
hub
  • तुमच्या मनोरंजनाचे हब आणि बरेच काही

  • रेग्युलर चॅनेल्स + वेबचे स्ट्रीम कंटेंट

  • Google Playstore वरून ॲप्स आणि गेम्स डाउनलोड करा

  • Google Assistant सह वॉईस सर्च

  • कस्टमाईज्ड करण्यायोग्य होम स्क्रीन

  • स्मार्ट होम डिव्हाईस नियंत्रित करा

एकाधिक यूजर प्रोफाईल तयार करा

अधिक वाचा

रिमोट ॲपसह तुमच्या फोनमधून त्याला नियंत्रित करा

अधिक वाचा

क्रोमकास्ट

अधिक वाचा

मिराकास्ट

अधिक वाचा

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

DishSMRT HUB म्हणजे काय? या बॉक्सवर उपलब्ध असणारी सर्व वैशिष्ट्ये कोणती?
DishSMRT Hub हा एक अँड्रॉईड टीव्ही आधारित इंटरनेट कनेक्टेड सेट-टॉप बॉक्स आहे जो तुम्हाला नियमित टीव्ही चॅनेल्सच्या अतिरिक्त विविध ॲप्स आणि गेम्सचा ॲक्सेस देतो. Google Assistant, बिल्ट-इन क्रोमकास्ट, वाय-फाय आणि ब्लूटूथ सपोर्ट आणि वॉईस रिमोट हे देखील समाविष्ट आहेत.
  • a) तुम्ही आता ॲमेझॉन प्राईम, झी5, वूट, सोनी लाईव्ह, अल्ट बालाजी, हॉटस्टार आणि यूट्यूब सारखे अनेक ॲप्स ॲक्सेस करू शकता आणि गूगल प्ले स्टोअरवरून अनेक डाउनलोड करू शकता.
  • b) इन-बिल्ट क्रोमोकास्टसह तुम्ही लॅपटॉप, टॅबलेट किंवा मोबाईल फोनमधून थेटपणे तुमच्या टीव्हीवर कोणतेही शो, सिनेमे, म्युझिक, गेम्स, स्पोर्ट्स, फोटो आणि व्हिडिओ अगदी सहज कास्ट करू शकता.
  • c) Google Assistant वॉईस सर्च मुळे कंटेंट शोध आता एकदम सोपे झाले आहे
  • d) तुम्ही तुमचे मनपसंत टीव्ही चॅनेल्सही पाहू शकता आणि तुमच्या सोयीनुसार मनपसंत कार्यक्रम ठरवू शकता, रिमाइंडर लावू शकता आणि रेकॉर्डही करू शकता
  • e) तुम्ही तुमच्या निवडक प्रोफाईलनुसार वैयक्तिकृत कंटेंट शिफारशी पाहू शकता.
ॲक्सेससाठी कोणते ॲप्स उपलब्ध आहेत?
ॲप विभागातून तुम्ही तुमच्या सेट-टॉप बॉक्सवर फीचर्ड आणि प्री-लोडेड ॲप्स जसे प्राईम व्हिडिओ, झी5, वूट, सोनी लाईव्ह, अल्ट बालाजी, हंगामा आणि Watcho करिता ॲक्सेस घेऊ शकता. तुम्ही अँड्रॉईड टीव्ही प्ले स्टोअरवरील विविध प्रकारात जसे की ओटीटी (यू-ट्यूब, हॉटस्टार), स्पोर्ट्स (ईएसपीएन, सीएनबीसी, एनबीसी, फॉक्स स्पोर्ट्स), बातम्या (एनडीटीव्ही, आज तक, इंडिया टुडे), सोशल मीडिया (फेसबुक, Watcho), प्रेरणात्मक (टेड टॉक्स), खाद्यप्रक्रिया (फूड नेटवर्क, किचन स्टोरीज), भक्तीपर (भक्ती इ. अॅप्स किंवा गेम्स (अस्फॉल्ट, बॉम्ब स्कॉड, मार्स उपलब्ध मधून डाउनलोड करू शकता.
या सेट-टॉप बॉक्सवर अन्य कोणती वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत?
हा अँड्रॉईड टीव्ही आधारित प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे त्यामध्ये नव्याने भर पडणारे आणि गुगलकडून नियमितपणे अपडेट होणारे फीचर्स असतील. ज्यापैकी लवकरच ज्यांची नव्याने भर पडेल असे- क्लाउड स्टोरेज आणि रेकॉर्डिंग इ.
नियमित सेट-टॉप बॉक्सपेक्षा DishSMRT Hub कसे चांगले आहे?
  • 1) हा अँड्रॉईड टीव्ही आधारित इंटरनेट कनेक्टेड सेट-टॉप बॉक्स 1GB रॅमसह आहे
  • 2) विविध ॲप्स आणि ऑपरेटिंग सिस्टीम अपडेट्स डाउनलोड करण्यासाठी 8GB इंटर्नल मेमरी
  • 3) सहज शोधासाठी वॉईस रिमोट
  • 4) पर्सनलायझेशनसाठी एकाधिक प्रोफाईल्स
  • 5) आवडीचे कंटेंट रेकॉर्ड करण्यासाठी दोन यूएसबी पोर्ट्स
  • 6) तुम्ही आता तुमचे मनपसंत टीव्ही चॅनेल्स पाहण्यासोबतच विविध ॲप्स आणि गेम्सचा ॲक्सेस घेऊ शकता
यूट्यूब/प्राईम/झी5 यासारख्या ॲप्सच्या वापराकरिता स्वतंत्र शुल्क आहे का?
प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेले मोफत ॲप्स किंवा गेम्स आणि यूट्यूब, गूगल प्ले मूव्हीज & टीव्ही, गूगल प्ले म्युझिक, गूगल प्ले गेम्स इ. सारखे गूगलवर उपलब्ध ॲप्स वापरण्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क नाहीत. तथापि, तुम्हाला त्यांच्या सबस्क्रिप्शन प्लॅननुसार पेड ॲप्ससाठी अतिरिक्तपणे सबस्क्राईब करावे लागू शकते.
रिमोट कंट्रोल वरील खालील बटनांचा वापर नेमका काय आहे?
  • होम: तुम्ही थेटपणे होम स्क्रीन ॲक्सेस करू शकतात
  • ऑप्शन: तुम्ही कोणत्याही कार्यक्रमाकरिता सविस्तर माहिती देणाऱ्या स्क्रीनचा ॲक्सेस घेऊ शकता.
  • Google Assistant: तुम्ही वॉईस सर्चकरिता वापरू शकता
  • बॅक : तुम्ही मागील विभागात परत जाऊ शकता
  • यूट्यूब: तुम्ही थेटपणे यूट्यूब ॲक्सेस करू शकता
  • Watcho : तुम्ही Watcho ॲप थेट ॲक्सेस करू शकता
  • सेटिंग्स: तुम्ही थेटपणे सेटिंग्स विभाग ॲक्सेस करू शकता
  • गाईड: तुम्ही थेट चॅनेल गाईड वापरू शकता
  • रेकॉर्डिंग: तुम्ही तुमच्या आवडीचे थेट प्रोग्राम रेकॉर्ड करू शकता.
मी एकाधिक यूजर प्रोफाईल्स कसे बनवू शकतो/ते? मी यापूर्वीच प्रोफाईल तयार कसे करू शकतो/ते?
तुमच्या स्क्रीनच्या सर्वात वरती डाव्या बाजूला असलेल्या प्रोफाईल विभागातून ॲक्सेस घेऊ शकतात. तुमच्या आवडीप्रमाणे 5 यूजर प्रोफाईलची बनवू शकता. याच प्रोफाईलमध्ये रिमोटवरील ऑप्शन बटनाचा वापर करून बदलही करू शकता. रिमोटच्या पर्यायाचा प्रमुख वापरूनही त्याच प्रोफाईल्स संपादित करू शकता.
एकाधिक यूजर प्रोफाईल निर्मितीचे फायदे कोणते?
तुम्हाला तुमच्या आवडीनुसार संबंधित कंटेंट शिफारशी मिळतील. तुम्ही स्क्रीनच्या तळाशी उपलब्ध असलेल्या “तुमचे टाईल्स कस्टमाईज करा” पर्यायांमधून तुमच्या सोयीनुसार तुमची होम स्क्रीन कस्टमाईज करू शकता. तसेच तुमच्यासाठी शिफारशीत रेलमध्ये तुमच्या प्रोफाईल अंतर्गत निवडलेल्या भाषा व शैलीनुसार तुम्हाला कंटेंट दाखविले जाईल.
मी चॅनेल्स किंवा ॲप्सचा वापर कसे करू शकतो/ते?
संबंधित चॅनेलवर जाण्याकरिता तुम्ही कोणताही चॅनेल क्रमांक एन्टर करू शकतात किंवा गाईडमधून तुमच्या आवडीच्या चॅनेलचा ॲक्सेस मिळवू शकता. तुम्ही अलीकडेच पाहिलेले चॅनेल किंवा ॲपला बॉक्सच्या होम स्क्रीनवर ॲक्सेस करू शकता.
मी चॅनेल ऑडिओची भाषा कशी बदलू शकतो/ते?
तुम्ही तुमच्या चॅनेल ऑडिओची भाषा तुमच्या रिमोटवर असलेल्या हिरव्या बटनाच्या सहाय्याने बदलू शकता.
मी टीव्ही गाईड कसे ॲक्सेस करू शकतो/ते?
तुम्ही रिमोटवरील बटनाचा वापर करून किंवा होम स्क्रीनवर असलेल्या साईड मेन्यू बारचा वापर करून थेटपणे गाईड ॲक्सेस करू शकता.
मी चॅनेल गाईडमधील शैलीमध्ये कसा बदल करू शकतो/ते?
तुम्ही शैली बदलण्यासाठी आणि आवश्यक म्हणून निवडण्यासाठी रिमोटवरील लाल बटनाचा वापर करू शकता. निवडलेली शैली तुमच्या गाईड स्क्रीनच्या वरच्या बाजूला लाल रंगात सूचित केली जाईल.
मी मनपसंत किंवा रिमाइंडर कसे सेट करू किंवा हटवू शकतो/ते?
तुम्ही चॅनेल इन्फोबार किंवा चॅनेल गाईडमधून थेट सेट किंवा हटवू शकता. हे रिमोटवरील ऑप्शन बटनाच्या ॲक्सेस योग्य अशा सविस्तर वर्णन केलेल्या स्क्रीनमधून सेट किंवा काढले जाऊ शकते.
मी माझे मनपसंत कार्यक्रम रेकॉर्ड करू शकतो/ते?
होय, तुम्ही चॅनेल इन्फोबार किंवा गाईडमधून किंवा तुमच्या रिमोटवरील रेकॉर्ड की वापरून तुमचे मनपसंत कार्यक्रम रेकॉर्ड करू शकता.
मी किती रेकॉर्ड करू शकतो/ते? मी किती वेळेचे रेकॉर्ड करू शकतो/ते? / माझ्यासाठी किती स्पेस आहे?
तुम्ही पेन ड्राईव्ह किंवा हार्ड ड्राईव्ह कनेक्ट केल्यानंतर अमर्यादित रेकॉर्डिंग करू शकता.
कमाल किती USB स्टोरेज सपोर्ट आहे? कोणता फॉरमॅट सपोर्ट करतो?
एनटीएफएस किंवा फॅट 32 स्वरुपात बॉक्सवर 500 GB चा जास्तीत जास्त क्षमतेचा सपोर्ट आहे.
मी भविष्यातील कार्यक्रम रेकॉर्ड करू शकतो का? मी मागील कार्यक्रम रेकॉर्ड करू शकतो का?
तुम्ही कोणताही सुरू असलेला कार्यक्रम किंवा पुढे होणारा कार्यक्रम रेकॉर्ड करू शकता.. तथापि तुम्ही यापूर्वी प्रसारित झालेला कार्यक्रम रेकॉर्ड करू शकत नाही.
मी इंटरनेट किंवा यू-ट्यूबवर असलेला कार्यक्रम रेकॉर्ड करू शकतो/ते का?
हे सर्व तुम्ही वापरात असलेल्या ॲप्सवर आधारित असेल. उदाहरणार्थ यू-ट्यूबमुळे तुम्हाला ऑफलाईन फीचर्स मिळतील जेणेकरून तुम्ही तुमच्या सेट-टॉप बॉक्सवर कार्यक्रम रेकॉर्ड करू शकता. परंतु झी5, वूट इ. ॲप्स तुम्हाला अशा प्रकारचे पर्याय उपलब्ध करून देणार नाहीत.
मी रेकॉर्ड केलेले कंटेंट कसे ॲक्सेस करू शकतो? मी ते कसे डिलिट करू शकतो?
रेकॉर्डेड कंटेंट साईड मेन्यू बारमध्ये उपलब्ध असलेल्या “माझे रेकॉर्डिंग सेक्शन” मधून ॲक्सेस केले जाऊ शकते. यामध्ये माझे रेकॉर्डिंग्स, शेड्यूल्ड रेकॉर्डिंग आणि रिमाइंडर असतील. तुम्ही माझे रेकॉर्डिंग्स वर क्लिक करून ते पाहू शकता. शेड्यूल्ड रेकॉर्डिंग आणि रिमाइंडर देखील पाहू शकता आणि डिस्क्रिप्शन पेज मधून डिलिट करू शकता.
मी माझा हार्ड डिस्क किंवा पेनड्राईव्ह कसा फॉरमॅट करू शकतो?
तुमचा ड्राईव्ह निवडण्यासाठी तुम्ही सेटिंग्स>रेकॉर्डर>हार्ड डिस्क फॉरमॅटमध्ये जाऊ शकता. नंतर निवडलेला ड्राईव्ह फॉरमॅट करण्यासाठी ऑप्शन बटणावर क्लिक करा.
मी पॅरेंटल कंट्रोल कसे सेट करू शकतो?
तुम्ही तुमच्या पसंतीनुसार सेटिंग्स>पॅरेंटल लॉकमधून चॅनेल्स लॉक करू शकता. तुम्हाला विभागाच्या ॲक्सेस करिता पासवर्डची निर्मिती करुन तो एन्टर करावा लागेल.. आधीच लॉक केलेले चॅनेल्स येथूनही अनलॉक केले जाऊ शकते. तुम्हाला येथून शैलीद्वारे चॅनेल्सला क्रमबद्ध करण्याचा पर्याय येईल.
DishSMRT HUB वर वापरण्यासाठी कोणते ब्राउजर सपोर्ट करतात?
प्लॅटफॉर्मवर कोणतेही अंतर्भूत ब्राउजर उपलब्ध नाहीत. तथापि, तुम्ही गूगल प्ले-स्टोअरमधून तुमच्या आवडीचे ब्राउजर डाउनलोड करू शकता जे तुमच्या मूलभूत ब्राउजिंग गरजांसाठी वापरता येतील. उदा. पुफिन टीव्ही ब्राउजरसाठी, टीव्ही वेब ब्राउजर, अँड्रॉईड टीव्हीसाठी वेब ब्राउजर इ.
मी ॲप्स ॲक्सेस किंवा नवीन ॲप्स कसे डाउनलोड करू शकतो/ते?
तुम्ही होम स्क्रीनवर सर्व ॲप्स किंवा फीचर्ड ॲप्समधून ॲक्सेस करू शकता. तुम्ही होम स्क्रीनवर उपलब्ध साईड मेन्यू बारमधून ॲप्स विभाग देखील ॲक्सेस करू शकता. तुम्ही सर्व ॲप्स विभागामधून फीचर्ड ॲप्स किंवा तुमचे डाउनलोड केलेले ॲप्स ॲक्सेस करू शकता. तुम्ही गूगल प्लेस्टोअर मधून नवीन ॲप्स किंवा गेम्स डाउनलोड करू शकता.
मी माझ्या डिव्हाईसमधून ॲप्स कसे डिलिट करू शकतो?
तुम्ही सेटिंग्स>अँड्रॉईड सेटिंग्स>ॲप्समध्ये जाऊ शकता. तुम्ही डिलिट किंवा अनइंस्टॉल करू इच्छिणारे ॲप निवडा.
माझ्या सेट-टॉप बॉक्सवर इंस्टॉल केलेले ॲप्स मी कसे अपडेट करू?
गूगल प्लेस्टोअर वरील डिफॉल्ट सेटिंग्स हे ॲप्सना स्वयंचलितपणे अपडेट करते जेव्हा एसटीबी इंटरनेटसह कनेक्ट असते.. हे अपडेट बॅकग्राऊंडमध्ये होतील आणि अपडेट कालावधी दरम्यान कार्य मंदगतीने होऊ शकते.. जर तुम्हाला असी समस्या आली तर तुम्ही स्वयंचलित ॲप अपडेट अक्षम करू शकता. हे शिफारस केले जात नाही कारण की तुम्ही नवीन अपडेट चुकवू शकता आणि भिन्न ॲप्समधून निश्चित करू शकता
डिव्हाईसवर डाउनलोड केलेले ॲप्स कुठे स्टोअर केले जातील?
डाउनलोड केलेले ॲप्स सेट-टॉप-बॉक्सच्या अंतर्गत मेमरीमध्ये स्टोर केले जातील. म्हणून तुमची डिव्हाईस मेमरी पूर्ण झाली की तुम्हाला जागा मोकळी करण्यासाठी काही ॲप्स डिलिट करावे लागतील. जसे की ते कोणत्याही अँड्रॉईड मोबाईल डिव्हाईससाठी केले जाते.
जर बॉक्स निष्क्रिय स्थितीमध्ये असेल तर कोणतेही ॲप किंवा इंटरनेट सेवा वापरु शकतो किंवा डाउनलोड करू शकता का?
तुमच्याकडे प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेले विविध ॲप्स किंवा वॉईस सर्च, पोस्टर्स इ. सारख्या इंटरनेट आधारित कोणत्याही सर्व्हिस यांचा ॲक्सेस हवा असल्यास ॲक्टिव्ह आणि कार्यरत डिश टीव्ही कनेक्शन असणे गरजेचे आहे.
मी सर्चचा कार्यक्षमतेने कशाप्रकारे वापर करू शकतो?
तुम्ही होम स्क्रीनवरील साईड मेन्यू बारकडून सर्चचा वापरू शकता. तुम्ही तुमच्या रिमोटचा वापर करून स्क्रीन कीवर्डवर तुम्हाला जे शोधत आहात ते थेटपणे टाईप करू शकता. तुम्ही संबंधित कंटेंट शोधण्यासाठी वॉईस सर्चचाही वापर करू शकता. रिमोटवरील बटणमधून वॉईस सर्च थेट ॲक्सेस केला जाऊ शकतो किंवा कीबोर्ड शोध दरम्यान एलएचएसच्या पुढील शोध टॅबवर उपलब्ध आहे.
मी वॉईस सर्चचा वापर कसा करू?
तुम्ही तुमच्या रिमोटवर Google Assistant बटन दाबू आणि रिमोटमध्ये तुम्हाला शोधण्याची इच्छा असलेले कीवर्ड बोलू शकता. Google Assistant उत्तर देईल किंवा तुमच्या समस्येसाठी तुम्हाला मदत करेल. तुम्ही Assistant ला हवे तितके प्रश्न विचारू शकता
  • 1)संपूर्ण ॲप्समध्ये मीडिया शोधा आणि प्ले करा
  • 2)टीव्ही पाहताना उत्तरे मिळवा
  • 3)तुमचे स्मार्ट होम डिव्हाईस नियंत्रित करा
  • 4)म्युझिक प्ले करा, हवामानाचे अपडेट आणि बरेच काही
तुम्ही तुमच्या गूगल होम ॲपवर स्वारस्य निकष सेट करू शकता. याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी कृपया भेट द्या https://support.google.com/googlenest/answer/7029585?co=GENIE.Platform%3DAndroid&hl=en
काहीवेळा वॉईस सर्चद्वारे सुसंगत परिणाम मिळत नाही. मी काय करावे?
तुम्ही चांगल्या परिणामांसाठी सेटिंग्ज> अँड्रॉईड सेटिंग्ज> भाषा बदलू शकता. तरीही आम्ही तुम्हाला इंग्रजी (इन) वापरण्याची शिफारस करतो.
प्रौढ मजकूर शोध परिणामांमध्ये सूचीबद्ध नाही याची खात्री करावी?
स्क्रीनवर कोणतेही एक्सप्लिसिट कंटेंट टाळण्यासाठी, कृपया खालील नमूद स्टेप्सचे अनुसरण करा. येथे जा, सेटिंग्स -> अँड्रॉईड सेटिंग्स -> सर्च: SafeSearchFilter सक्षम करा
यूट्यूब शिफारशी तुमच्या व्ह्युईंग पॅटर्नवर आधारित कार्य करतात. तुम्ही यूट्यूब सेटिंग्समधून प्रतिबंधित मोड सक्षम करण्याद्वारे येथे एक्सप्लिसिट कंटेंट अक्षम करू शकता. तसेच, तुमची ब्राउजिंग हिस्टरी साफ करा.
येथे जा, यूट्यूब -> सेटिंग्स: प्रतिबंधित मोड सक्षम करा
हा बॉक्स कोणत्याही विशिष्ट प्रकारच्या टीव्हीसह अनुकूल आहे का?
DishSMRT HUB हे 4K, एलईडी वर HD, एलसीडी किंवा प्लाझ्मा तंत्रज्ञान सह सर्व प्रकारच्या टीव्ही सह सुसंगत आहे. बॉक्स एचडीएमआय आणि सीव्हीबीएस आऊटपुटलाही सपोर्ट करतो. त्यामुळे एचडीएमआय आणि सीव्हीबीएस इनपुटसह समर्थित सर्व प्रकारच्या टीव्ही सह सुसंगत आहेत.
या बॉक्ससह तंत्रज्ञानातील बदल काय आहे?
बॉक्स अँड्रॉईड टीव्ही आधारित इंटरनेट कनेक्टेड सेट-टॉप-बॉक्स आहे. पूर्वीचे बॉक्स SD/HD होते आणि काही रेकॉर्डर सुविधा आहेत.
प्रारंभिक सेट-अप नंतर कोणत्याही समस्येच्या बाबतीत मी माझे ब्लूटूथ रिमोट कसे जोडू शकतो?
तुमचा ब्लूटूथ रिमोट पुन्हा जोडण्यासाठी कृपया आरसीयूवर लाल एलईडी ऑन होईपर्यंत "ओके" दाबा आणि होल्ड करा. यानंतर तुमचा रिमोट पुन्हा जोडला जाईल. जेव्हा या विशिष्ट समस्या अवलंबून असते तेव्हा त्याच पायऱ्यांचे पालन करा.
मी टीव्ही पॉवरसाठी लर्निंग कीचा वापर कसा करू शकतो आणि रिमोटवरील सोर्स की बद्दल?
यूजर मॅन्युअल पान क्र. 6 वरील सेट-अप रेफर करा. आरसीयूवर उपलब्ध टीव्ही पॉवर आणि सोर्स की टीव्ही नियंत्रणासाठी वापरली जाऊ शकतो.
मी सेट-टॉप बॉक्स इंटरनेटला कशा प्रकारे कनेक्ट करू शकेल ?
DishSMRT HUB मध्ये वाय-फाय रिसीव्हर इन-बिल्ट आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या होम वाय-फाय नेटवर्क किंवा मोबाईल हॉटस्पॉटशी सहजपणे कनेक्ट करू शकता. जर तुमच्याकडे कोणतेही वाय-फाय नेटवर्क नसेल तर तुम्ही इथरनेट केबलचा वापर करून तुमचा बॉक्स कनेक्ट करू शकता.
यासाठी किमान किती इंटरनेटचा स्पीड आवश्यक आहे?
शिफारशित इंटरनेट स्पीड 4 Mbps आणि त्यापेक्षा अधिक आहे. कृपया लक्षात घ्या की 4K कंटेंट उच्च गती पाहण्याची आवश्यकता असू शकते.
जर मी इंटरनेट वापरत नसेल तर मी याचा वापर साधा एसटीबी म्हणून करू शकतो का?
होय, तुम्ही ते एक साधारण सेट-टॉप बॉक्स म्हणून वापरू शकता, परंतु सर्वोत्तम अनुभवासाठी तो इंटरनेट कनेक्शनसह वापरण्याची शिफारस केली जाते.
या बॉक्समध्ये अंतर्गत मेमरी किती आहे आणि ती मी कशी वापरु शकतो?
बॉक्समध्ये 8GB अंतर्गत मेमरी आहे. यूजर त्याच्या आवश्यकतेनुसार गूगल प्ले स्टोअर मधून ॲप्स आणि गेम्स डाउनलोड करू शकतो. ॲप्स हाताळण्यासाठी आणि डिलिट करण्यासाठी हा पाथ पाहा - सेटिंग्स>अँड्रॉईड सेटिंग्स >ॲप्स>संबंधित ॲप निवडा>अनइंस्टॉल करा.
मला यासाठी तुमच्याकडून रेकॉर्डिंग/ डाउनलोड करण्यासाठी जागा मिळेल?
रेकॉर्डिंग करिता यूजरला स्वत:चा पेन ड्राईव्ह किंवा यूएसबी डिस्क कनेक्ट करावी लागेल.
जर सर्व अंतर्गत मेमरीचा वापर करण्यात आल्यास मी काय करावे? मी अंतर्गत स्टोरेजचा विस्तार करू शकतो का?
इंटर्नल स्टोरेजचा विस्तार केला जाऊ शकत नाही. तुम्हाला बॉक्स मेमरीमध्ये वाढ करण्यासाठी काही ॲप्स डिलिट करावे लागतील.
माझ्या वैयक्तिक यूएसबी ड्राईव्हमध्ये असलेले फोटो, मूव्हीज कसे पाहू.
तुम्हाला पेन ड्राईव्ह कनेक्ट आणि तुम्ही बाह्य स्टोरेजमध्ये उपलब्ध डाटा शोधण्यासाठी सर्व ॲप्समध्ये डाउनलोड केलेल्या ॲपला "फाईल ब्राउजर" ॲक्सेस करण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला स्थानिक कंटेंट ब्राउजिंगला सपोर्ट करणारे कोणतेही ॲप गूगल प्लेस्टोअर मधून डाउनलोड करण्याची आवश्यकता आहे. काही उदाहरणे एफएक्स फाईल एक्सप्लोरर, व्हीएलसी, एक्स-प्लोर फाईल मॅनेजर, फाईल मॅनेजर प्रो अँड्रॉईड टीव्ही इ.
माझ्या स्मार्टफोन्स मधील माझे फोटो, मूव्हीज कसे पाहायचे? कास्ट कसे वापरायचे?
तुम्ही तुमचा फोन मोठ्या स्क्रीनवर थेटपणे कास्ट किंवा स्क्रीन मिरर करू शकता. कास्टिंग फीचर वापरण्यासाठी, DishSMRT HUB आणि तुमचा स्मार्टफोन एकाच वाय-फाय नेटवर्कवर कनेक्ट असायला हवेत. पुढे, तुमच्या स्मार्टफोन मधून कोणतेही कास्ट सक्षम ॲप उघडा. टीव्ही स्क्रीनवर कंटेंट पाहण्यासाठी कास्ट आयकॉन दाबा आणि तुमच्या टीव्हीवर ॲप्लिकेशन्स कास्ट करा.
तुम्ही टीव्हीवर स्क्रीन मिरर करण्यासाठी तुमच्या स्मार्टफोनवर गूगल होम ॲप्लिकेशन देखील वापरू शकता. कास्टिंगविषयी अधिक जाणून घेण्यासाठी, कृपया भेट द्या https://support.google.com/chromecastbuiltin/answer/6059461?hl=en
क्रोमकास्टवर सपोर्ट होणारी सर्व ॲप्लिकेशन कोणती आहेत?
क्रोमोकास्ट सक्षम ॲप्स यादी साठी पाहा – https://www.google.com/chromecast/built-in/apps/
मी इंटरनेट पाहण्यास सक्षम नाही मात्र डीटीएच कनेक्शन काम करीत आहे. काय करावे?
कृपया तुमचे इंटरनेट कनेक्शन सुरू असल्याची खात्री करा.. किमान आवश्यक गती 4 Mbps आहे. जर तुम्ही तुमच्या अँड्रॉईड बॉक्सवर कोणतीही ऑनलाईन कंटेंट पाहू शकत नसाल तर कृपया खालील गोष्टी तपासा:
  • 1)कृपया याच नेटवर्कवर असलेल्या तुमच्या स्मार्टफोन किंवा लॅपटॉपवर इंटरनेट ॲक्सेस करण्यास सक्षम आहात का ते तपासा. जर होय, तर तुम्हाला तुमच्या बॉक्सवर वाय-फाय किंवा आयपी सेटिंग्स तपासण्याची गरज असेल.
  • 2)कोणतेही ॲप अपडेट प्रक्रियेत आहेत का? जर होय असेल तर कृपया अपडेट समाप्त झाल्यानंतर पुन्हा तपासा.
टीव्हीवर नेटवर्क गती तपासण्यासाठी कोणतेही ॲप आहे का?
तुम्ही एटीव्ही प्लेस्टोअर वर उपलब्ध असलेले स्पीडटेस्ट ॲप वापरू शकता.
माझ्या टीव्ही पाहण्याच्या अनुभवावर हवामानाचा परिणाम होईल का?
खंडित किंवा ब्लॉक सिग्नल मुळे खराब हवामान दरम्यान डीटीएच सिग्नलवर परिणाम होऊ शकतो. तथापि आपणास कनेक्टिव्हिटी स्थिर असेल तर अखंडित इंटरनेट आधारित सेवांचा अनुभव येऊ शकेल.
दीर्घ कालावधीसाठी टीव्ही कार्यक्रम पाहायचा असल्यास मला किती पैसे लागतील?
कोणताही टीव्ही चॅनेल पाहायचा असल्यास तुम्हाला कोणतेही इंटरनेट शुल्क आकारले जाणार नाही. होम स्क्रीनवरील शिफारशी आणि वॉईस सर्च फीचर वापरण्यासाठी इंटरनेट कनेक्टिव्हिटी आवश्यक आहे मात्र डाटा वापर खूपच कमी असेल. जर तुम्हाला कोणताही ऑनलाईन व्हिडिओ किंवा कंटेंट पाहायचा असेल तरच तुम्हाला डाटा शुल्क आकारले जाऊ शकेल, जे निवडक व्हिडिओ क्वालिटीवर अवलंबून असेल आणि ॲप ते ॲप बदलू शकेल.
जर माझ्याकडे इंटरनेट कनेक्शन नसेल तर कोणती वैशिष्ट्ये उपलब्ध होणार नाहीत?
फीचर्स जसे की वॉईस/टेक्स्ट आधारित सर्च, होमपेजवरील शिफारशी, अँड्रॉईड टीव्ही सर्व्हिसेस जसे की यूट्यूब, प्ले स्टोअर, इंटरनेट कनेक्टिव्हिटी असणारे फीचर्ड ॲप्स हे इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्यास अनुपलब्ध असणार.
रेकॉर्डिंग करताना अन्य कार्यक्रम पाहणे शक्य आहे का?
तुमच्या DishSMRT HUB मध्ये एकच ट्यूनर आहे. याचा अर्थ असा तुम्ही कोणत्याही वेळी एकाच डीटीएच चॅनेलमध्ये ट्यून करू शकता. तुम्ही त्याचवेळी खालील गोष्टी करू शकता
  • 1)रेकॉर्ड करा आणि ते चॅनेल पुन्हा पाहा
  • 2)1 चॅनेल रेकॉर्ड करा आणि अन्य ॲप्सवर काहीतरी पाहा
  • 3)1 चॅनेल रेकॉर्ड करा आणि रेकॉर्डिंग पाहा
  • 4)लाईव्ह टीव्हीला पॉज करा
माझा सध्याचा टीव्ही रिमोट DishSMRT HUB सोबत काम करेल का?
नाही. संबंधित सेक्शनच्या डायरेक्ट ॲक्सेससाठी dishsmrt hub नवीन ब्लूटूथ रिमोट कंट्रोलचा वापर करते ज्यामध्ये Google Assistant, होम, पर्याय, यूट्यूब आणि Watcho यासारख्या विशेष मुद्द्यांचा समावेश आहे.
या ब्लूटूथ रिमोटमध्ये कोणते नवीन फीचर्स उपलब्ध आहेत?
सेट-अपचा भाग म्हणून सेट-टॉप बॉक्ससह पेअरिंग असणे आवश्यक आहे.
  • 1)वॉईस सर्च
  • 2)टीव्हीच्या दिशेने धरून ऑपरेट करण्याची गरज नाही
  • 3)तुम्ही टाईप करण्यासाठी कीबोर्ड वापरू शकता आणि तुमच्या आवडीचे कंटेंट शोधू शकता
मी माझे ब्लूटूथ स्पीकर्सही कनेक्ट करू शकतो/ते का?
होय, ब्लूटूथ स्पीकर्स कनेक्ट होऊ शकतात.
अँड्रॉईड बॉक्स नियंत्रित करण्यासाठी मी माझा मोबाईल वापरू शकतो का?
तुम्ही प्लेस्टोअर वरून अँड्रॉईड टीव्ही रिमोट कंट्रोल ॲप डाउनलोड करू शकता आणि तुमचा अँड्रॉईड बॉक्स कंट्रोल करण्यासाठी त्याचा वापर करू शकता. सुरू करण्यासाठी, तुमचा अँड्रॉईड फोन किंवा टॅबलेट तुमचे अँड्रॉईड टीव्ही डिव्हाईस ज्या नेटवर्कसह कनेक्ट आहे त्यासोबतच कनेक्ट करा आणि नंतर ब्लूटूथ द्वारे तुमचा अँड्रॉईड टीव्ही शोधा. हे झाल्यानंतर, तुम्ही तुमचा अँड्रॉईड फोन किंवा टॅबलेट तुमच्या अँड्रॉईड टीव्हीसाठी रिमोट म्हणून वापरू शकता. तुमच्या अँड्रॉईड टीव्ही डिव्हाईसवर कंटेंट नेव्हिगेट करण्यासाठी आणि गेम्स खेळण्यासाठी अगदी सहजपणे डी-पॅड आणि टचपॅड मोड्स दरम्यान स्विच करा. वॉईस सर्च सुरू करण्यासाठी ‘माईक’ वर टॅप करा किंवा अँड्रॉईड टीव्हीवर टेक्स्ट टाईप करण्यासाठी 'कीबोर्ड' वापरा.
नवीनतम अँड्रॉईड सॉफ्टवेअर अपडेट्ससाठी मी कशी तपासणी करू शकतो?
तुम्ही अँड्रॉईड सेटिंग्सला भेट देऊ शकता आणि कोणतेही सिस्टीम किंवा रिमोट कंट्रोल सॉफ्टवेअर अपडेट तपासण्यासाठी विषयी विभागात जाऊ शकता.
मी सेट-टॉप-बॉक्स सॉफ्टवेअर अपडेट्सकरिता कसे तपासू शकतो?
तुम्ही नवीन सॉफ्टवेअर उपलब्धतेची तपासणी करण्यासाठी सेटिंग्ज> टूल्स> सॉफ्टवेअर अपग्रेड विभागाला भेट देऊ शकता.
काहीवेळा माझ्या सेट-टॉप बॉक्सचा प्रतिसाद अतिशय संथ आहे. ही समस्या कशी सोडवू?
तुम्हाला अशा परिस्थितीमधून रिकव्हर करण्यासाठी पॉवर रिसायकल करणे गरजेचे आहे. त्यानंतरही समस्या कायम राहिल्यास, सेटिंग्स > अँड्रॉईड सेटिंग्स > स्टोरेज आणि रिसेट असा पाथ वापरून फॅक्टरी डाटा रिसेट पर्याय निवडा.
**कूपनदुनिया ऑफरच्या अटी व शर्तींसाठी येथे क्लिक करा | रिडीम कसे करावे हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
  • मिराकास्ट
  • तुमच्या dishSMRT HUB असलेल्या टीव्हीवर तुमच्या अँड्रॉईड डिव्हाईसमधून कंटेंट मिरर करा
  • स्मार्ट होम डिव्हाईस नियंत्रित करा
  • म्युझिक, हवामान आणि खूप सार्‍या गोष्टी मिळवा
  • मिराकास्ट-सर्टिफाईड डिव्हाईस, त्यांचे उत्पादक कोणतेही असले तरीही एकमेकांशी कम्युनिकेट करू शकतील
  • एकाधिक यूजर
  • तुमच्या रेलसाठी वैयक्तिकृत शिफारशी मिळवा
  • तुमच्या प्रोफाईलनुसार मनपसंत चॅनेल्स आणि लॉक चॅनेल्स सेट करा
  • तुमच्या वॉचिंग हिस्ट्री (ॲप किंवा टीव्ही चॅनेल्स) नुसार होम स्क्रीनवरील अलीकडील रेल
  • होम स्क्रीनमध्ये असलेले कस्टमायझेशन निवडलेल्या प्रोफाईलनुसार बदलेल
  • त्याला नियंत्रित करा
  • तुमच्या अँड्रॉईड बॉक्ससाठी रिमोट म्हणून तुमचा अँड्रॉईड फोन किंवा टॅबलेट वापरा
  • प्ले स्टोअरवर उपलब्ध एटीव्ही रिमोट ॲप डाउनलोड करा
  • डी-पॅड आणि टचपॅड मोडमध्ये सहजपणे स्विच करा
  • वॉईस सर्च सुरू करण्यासाठी माईक उपलब्ध आहे किंवा कीबोर्ड वापरा
  • क्रोमकास्ट
  • ॲप्समध्ये मीडिया शोधा आणि प्ले करा
  • टीव्ही पाहताना प्रश्न विचारा
  • स्मार्ट होम डिव्हाईस नियंत्रित करा
  • म्युझिक, हवामान आणि खूप सार्‍या गोष्टी मिळवा

    Watcho धमाल सह एका महिन्यासाठी कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय ₹1066 किंमतीच्या 16 ओटीटी ॲप्सचा आनंद घ्या.

    watcho dhamaal pack

    T&C Apply
    टॉपवर स्क्रोल करा